गुरुवार, ५ जुलै, २०१८

काश्मिर खोऱ्यात सीआरपीएफच्या महिला कमांडो तैनात - ५ जुलै २०१८

काश्मिर खोऱ्यात सीआरपीएफच्या महिला कमांडो तैनात - ५ जुलै २०१८

* काश्मीर खोऱ्यात दगडफेक करणाऱ्या तरुणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाने सीआरपीएफ महिला कमांडोना तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. 

* काश्मीर खोऱ्यात जवानांवर दगडफेक करणाऱ्यामध्ये अनेकदा तरुण मुलीचा समावेश असतो. या तरुणीवर कारवाई करण्यासाठी ५०० महिला कमांडोना तैनात करण्यात आले आहे. 

* श्रीनगरमध्ये ४५ दिवसांच्या प्रशिक्षणानंतर महिला कमांडोना तैनात करण्यात येणार आहे. सीआरपीएफच्या महिला युनिटला सर्व प्रकारची शस्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. 

* या महिला कमांडोना काश्मीर खोऱ्यातील हिंसाचारासंबंधी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. संरक्षणासाठी त्यांनी कमी वजनाचे बॉडी प्रोटेक्टर्स हेल्मेट, बुलेटप्रूफ जॅकेट, आणि शस्त्र देण्यात येणार आहे. 

* जर एखाद्या दहशतवादी कारवाईदरम्यान महिलांना दगडफेक करण्यास सुरुवात केली तर महिला कमांडो त्यांना मदत करतील. 

* २०१६ पासून काश्मीर खोऱ्यात दगडफेकीच्या घटनांचे प्रमाण कमी झाले आहे. यावर्षी दगडफेकीच्या एकूण ३०० घटना घडल्या आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.