बुधवार, ४ जुलै, २०१८

विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत मनू भाकेरला सुवर्णपदक - २ जुलै २०१८

विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत मनू भाकेरला सुवर्णपदक - २ जुलै २०१८

* जर्मनीत सुरु असलेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या मनू भाकेरने चीनच्या कायमन लूवर मात करत सुवर्णपदकाची कमाई केली.

* १६ वर्षीय मनू भाकेरने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात २४२.५ गुणांची कमाई करत विक्रमाची नोंद केली. या वर्षातील मनूचे हे सातवे सुवर्णपदक आहे.

* मनूने याआधी याच स्पर्धेत आपली सहकारी महिमा अग्रवालसोबत सांघिक प्रकारात कास्यपदकाचीही कमाई केली.

* याच स्पर्धेत भारताच्या उदयवीर आणि विजयवीर सिद्धू या जुळ्या भावांनी आपला सहकारी राजकवर सिंह याच्यासोबत २५ मीटर पिस्तूल प्रकारात सांघिक सुवर्णपदकाची कमाई केली आहे. उदयविरने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक पटकाविले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.