शनिवार, २८ जुलै, २०१८

कैलासवडीवू सिवन यांना टिळक पुरस्कार जाहीर - २७ जुलै २०१८

कैलासवडीवू सिवन यांना टिळक पुरस्कार जाहीर - २७ जुलै २०१८

* अवकाश शास्त्रज्ञ डॉ कैलासवडीवू सिवन यांना टिळक पुरस्कार जाहीर झाला. सुवर्णपदक, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये असे त्याचे स्वरूप आहे.

* टिळक यांच्या ९८ व्या पुण्यतिथीनिमित्त १ ऑगस्ट रोजी टिळक स्मारक मंदिर येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. अशी माहिती लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ दीपक टिळक व विश्वस्त डॉ रोहित टिळक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

* भारतीय अवकाश संशोधन संस्थेने इस्रो च्या प्रक्षेपणातून एकाचवेळी १०४ उपग्रह अवकाशात सोडले. तो विक्रम इस्रोचे अध्यक्ष डॉ सिवन यांच्या नेतृत्वाखाली झाला होता.

* जागतिक स्तरावर भारतीय अवकाश संशोधनाची कीर्ती पोचविल्याबद्दल त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.