रविवार, २२ जुलै, २०१८

मेघा धाडे मराठी बिग बोस सिजनची पहिली विजेती - २२ जुलै २०१८

मेघा धाडे मराठी बिग बोस सिजनची पहिली विजेती - २२ जुलै २०१८

* मराठी बिग बॉस या रियालिटी शोच्या पहिल्या सिजनमध्ये अभिनेत्री आणि निर्माती मेघा धाडे विजेती ठरली. तिला १८ लाख ६० हजाराच्या पारितोषिकासह चषक देऊन गौरविण्यात आले.

* तसेच निर्वाळा रियालिटी सिटी ऑफ म्युझियमकडून तिला घर बक्षीस देण्यात आले. पुष्कर जोग हा उपविजेता ठरला. तर स्मिता गोंदकर तिसऱ्या क्रमांकावर राहिली.

* मराठी बिग बॉस चा पहिला विजेता कोण याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. रविवारी झालेल्या बिग बॉसच्या महाअंतिम सोहळ्यात विजेत्यांचे नाव अखेरीस घोषित झाले.

* बिग बॉसच्या या पहिल्या सीझनमध्ये १८ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यातील सहा स्पर्धकांमध्ये मेघा धाडे, शर्मिष्ठा राऊत, आस्ताद काळे, स्मिता गोंदकर, पुष्कर जोग, आणि सई लोकूर, अंतिम फेरीत दाखल झाले होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.