शुक्रवार, २० जुलै, २०१८

आशियाई कुमार स्पर्धेत मानसीला रौप्य व स्वातीला ब्राँझ पदक - २० जुलै २०१८

आशियाई कुमार स्पर्धेत मानसीला रौप्य व स्वातीला ब्राँझ पदक - २० जुलै २०१८

* आशियाई कुमार कुस्ती स्पर्धेत शुक्रवारी भारतासाठी मानसी आणि स्वाती शिंदे यांनी पदकाची कमाई केली. मानसीला ५७ किलो वजनी गटात रौप्य, तर कोल्हापूरच्या स्वातीला ५३ किलो गटात ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले.

* मुलीच्या गटात जपानने अपेक्षित वर्चस्व राखताना ७ सुवर्ण १ रौप्यपदक पटकावून २१३ गुणांसह विजेतेपद पटकाविले. चीन उपविजेते राहिले. भारत २ रौप्य ३ ब्राँझ पदकासह तिसऱ्या स्थानावर राहिले.

* मानसीने कझाकिस्तानच्या अमोनोवाला निष्प्रभ ठरविले. उपांत्य फेरीत तिने थायलंडच्या नरिनला कोणतीच संधी दिली नाही. अंतिम फेरीत मात्र ती जपानच्या एकिहनापुढे टिकली नाही.

* स्वातीने पहिलेच आंतरराष्ट्रीय पदक मिळविले, तिने थायलंडच्या बूनयासुविरुद्धची लढत एकतर्फी १०-० अशी जिंकली. प्रथम ताबा मिळविताना दोन गूण घेत स्वातीने गुणांचे खाते उघडले आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.