रविवार, ८ जुलै, २०१८

जिम्नॅस्टिक दीपा कर्माकरला सुवर्णपदक - ८ जुलै २०१८

जिम्नॅस्टिक दीपा कर्माकरला सुवर्णपदक - ८ जुलै २०१८

* तब्बल दोन वर्ष दुखापतीमुळे मैदानापासून बाहेर राहिलेल्या जिम्नॅस्टिक दीपा कर्माकरने धडाक्यात सुरुवात केली आहे.

* तुर्कीच्या मेरसिन शहरात सुरु असलेल्या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक विश्वचषकात दीपाने सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

* २४ वर्षीय दीपा कर्माकरच रियो ऑलिम्पिकमध्ये अवघ्या काही गुणांच्या फरकाने सुवर्णपदक हुकलं होत. त्यानंतर दीपा दुखापतीमुळे काहीकाळ जिम्नॅस्टिक फिल्डच्या बाहेर होती.

* मात्र महत्वाच्या स्पर्धेअभावी दीपाने जोरदार तयारी करत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. दीपाच विश्वचषकातल हे पाहिलं विजेतेपद ठरलं आहे.

* पात्रता फेरीत दीपा कर्माकरने ११.८५० गुणांची कमाई केली होती. आगामी आशियाई खेळासाठी भारताच्या जिम्नॅस्टिक चमूमध्ये दीपा कर्माकरची निवड करण्यात आली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.