मंगळवार, २४ जुलै, २०१८

२०२० पासून [बीएस-६] मानांकनाची सक्ती - २३ जुलै २०१८

२०२० पासून [बीएस-६] मानांकनाची सक्ती - २३ जुलै २०१८

* वाढते प्रदूषण रोखण्यासाठी [बीएस-६] इंधन मानकांना अनुरूप नसलेल्या वाहनांच्या उत्पादन व विक्रीस एक एप्रिल २०२० नंतर परवानगी देऊ नये. अशी भूमिका आज केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात मांडली.

* जुन्या वाहनांचा वापर सुरु ठेवल्यास स्वच्छ इंधनाच्या वापरामुळे मिळणारे फायदे कमी होतील. असेही सरकारने म्हटले आहे.

* यावेळी पेट्रोलियम मंत्रालयाने प्रतिज्ञापत्र सादर केले असून, त्यात कार्बन उत्सर्जन यांच्या संदर्भातील मानकांची पूर्तता न करणाऱ्या वाहनांच्या उत्पादन व विक्रीला एप्रिल २०२० पासून परवानगी न देण्याची भूमिका घेतली आहे.

* बीएस-६ या इंधनासाठी सुमारे २८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. २०२० नंतर या इंधन मानकांची पूर्तता न करणाऱ्या वाहनांची निर्मिती सुरु राहिली.

* ३१ मार्चपर्यंत उत्पादन झालेल्या बीएस-४ वाहनांच्या नोंदणीसाठी जून २०२० पर्यंतची मुदत देण्यात येईल.तसेच कोणते वाहन बीएस ३,४,६ आहे हे कसे ओळखणार तर यावर बीएस ६ वाहनापासून त्याची सुरुवात करावी.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.