सोमवार, ९ जुलै, २०१८

आयसीसी टी-२० रँकिंग - १० जुलै २०१८

आयसीसी टी-२० रँकिंग - १० जुलै २०१८

* भारतीय संघाचा सलामीवीर लोकेश राहुल याने रविवारी इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात दमदार खेळी करत आयसीसी रँकिंगमध्ये ९ व्या स्थानावरून थेट तिसऱ्या स्थानावर उडी मारली. 

* टीम इंडियाचा या रँकिंग मध्ये दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. आयसीसीच्या या टी-२० च्या ताज्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ऍरॉन फिंच ९०० रेटिंगसह पहिल्या स्थानावर आहे. 

* पाकिस्तानच्या फखर जमा दुसऱ्या स्थानावर तर राहुल तिसऱ्या स्थानावर आहे. राहुलने गेल्या चहर टी-२० सामन्यात ७०, १०१, ६ आणि १९ धावा केल्या. यामुळे त्याने ९ अंकाची उसळी घेत आपल्या करिअरची सर्वश्रेष्ठ रँकिंग मिळवली आहे. 

* या स्थानावर पोहोचलेला तो भारताचा पहिलाच फलंदाज आहे. त्यानंतर रोहित शर्माचा ११ वा क्रमांक लागतो. या मालिकेत विराट कोहली मोठी धावसंख्या गाठू न शकल्याने चौथ्या स्थानावर घसरला आहे. 

* याउलट फिंच याने झिम्बॉम्बेविरुद्ध १७२ धावसंख्या उभारल्याने ८९१ वरून ९०० रेटिंग मिळवत पहिल्या स्थानावर स्थान प्राप्त केले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.