गुरुवार, १९ जुलै, २०१८

काही नवीन चालू घडामोडी - १८ जुलै २०१८

काही नवीन चालू घडामोडी - १८ जुलै २०१८

* भारताच्या सुपरसॉनिक ब्राम्होस क्षेपणास्त्राची १६ जुलै ओडिशाच्या चांदीपूर तळावरून अत्यंत कठोर चाचणी घेण्यात आली.

* भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू रमेश पोवार याची भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली.

* रुग्णांच्या शुश्रूषा करण्यात मोलाची कामगिरी केल्याबद्दल कश्मिरा सांगळे या महाराष्ट्रातील फिजिओथेरपिस्टचा इंग्लंडच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेंतर्फे एनएसएस विंडरश पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

* पंतप्रधानांच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींनी राकेश सिन्हा, राम शकल, सोनल मानसिंग, रघुनाथ महापात्रा यांची चार जणांची नियुक्ती राज्यसभेत करण्यात आली.

* थायलंड ओपन वर्ल्ड टूर सुपर बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम लढतीमध्ये पी व्ही सिंधूला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. सिंधू पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचली आहे.

* पुढील वर्षी होणारी विधानसभा निवडणूक लक्षात घेता आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी तामिळनाडूमधील [अम्मा कँटिंग] च्या धर्तीवर [अण्णा कँटिंग] शहरी भागामध्ये सुरु केली आहेत.

* क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये १० हजार धावा काढल्या आहेत. असा तो चौथा भारतीय ठरला आहे. दुसरा विकेटकिपर, तसेच १२ वा जागतिक फलंदाज ठरला आहे.

* अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने एच-१ बी व्हिसाचे नूतनीकरण न झाल्यास व्हिसाधारकाला थेट मायदेशी पाठविण्याची तरतूद असलेले धोरण लागू केले आहे.

* फळबागांची लागवड वाढावी म्हणून महाराष्ट्र शासनाने कृषी विभागांतर्गत दिवंगत माजी कृषिमंत्री भाऊसाहेब पांडुरंग फुंडकर यांच्या नावाने फळबाग लागवड योजना लागू केली आहे.

* शांतता, मानवता, आणि शाकाहार यांच्या प्रसारासाठी आयुष्य वेचणारे अध्यात्मिक गुरु दादा जे. पी. वासवानी यांचे वयाच्या ९९ व्या वर्षी वृद्धापकाळाने ११ जुलै रोजी निधन झाले.

* आरबीआयच्या नव्या नियमानुसार डिमांड ड्राफ्ट, पे ऑर्डर आणि बँकेने काढलेल्या धनादेशावर देणारा व घेणारा अशा दोन्ही व्यक्तींची नावे नोंदविणे बंधनकारक केले आहे.

* युगांडाचा संशोधक २४ वर्षीय ब्रायन गिट्टा याने रक्ताची चाचणी करण्यासाठी शोधलेल्या उपकरणाला अभियांत्रिकी नवप्रवर्तनाचा पुरस्कार मिळाला आहे.

* मुंबई रणजी संघाच्या प्रशिक्षकपदी माजी यष्टीरक्षक फलंदाज विनायक सामंत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

* चाईल्ड राईट्स अँड यु [क्राय] या सामाजिक संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार भारतातील १५ ते १८ वयोगटातील सुमारे २.३ कोटी मुले बालकामगार आहेत.

* बालरंगभूमीचे जनक म्हणून ओळख असणारे ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवासन शिंदगी यांचे ११ जुलै रोजी दीर्घ आजाराने निधन झाले.

* आशियाई कुमार कुस्ती स्पर्धेत भारताने पहिल्या दिवशी एका सुवर्णपदकासह दोन रौप्य आणि एक ब्राँझपदक मिळविले. ग्रीको रोमन गटातील साजन सुवर्णपदकाचा मानकरी ठरला.

* मोदी केअर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या केंद्राच्या आयुषमान योजनेत सहभागी होण्यास सुरवातीला तयार नसणाऱ्या महाराष्ट्र आणि राजस्थाननेही आता सहभागी होण्याची इच्छा दर्शविली आहे.

* नागपूर-मुंबई हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी भारतीय रेल्वे, महामेट्रो, महाराष्ट्र शासन यांच्यात [महामेट्रो फिडर ट्रेन्स प्रकल्पाच्या सामंजस्य प्रकल्पावर स्वाक्षरी करण्यात आली.

* ज्येष्ठ अभिनेत्री रिटा भादुरी यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झाले. टेलिव्हिजन आणि चित्रपट विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्ह्णून रिटा यांची ओळख होती.

* महाराष्ट्रातील वर्षानुवर्षे रखडलेल्या सिंचन प्रकल्पावर केंद्र सरकारने घसघशीत निधीचे सिंचन केले आहे. अशा राज्यातील ९१ प्रकल्पांचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी राज्याला १३ हजार ६६१ कोटी रुपयांच्या निधीचे साह्य केंद्राकडून मंजुरी देण्यात आली.

* भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने आयसीसी वनडे रँकिंगमधील आपले अव्वल स्थान कायम राखत कारकिर्दीतील सर्वश्रेष्ठ ९११ अंकांची कमाई केली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.