शनिवार, ७ जुलै, २०१८

केंद्र सरकारकडून १४ खरीप पिकांच्या हमीभावात दीडपटीने वाढ - ७ जुलै २०१८

केंद्र सरकारकडून १४ खरीप पिकांच्या हमीभावात दीडपटीने वाढ - ७ जुलै २०१८

* पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचा निर्णय घेतला आहे. 

* नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. निवडणुकीला जेमतेम एक वर्ष असताना त्या आश्वासनाची अंमलबजावणी केली जात आहे. 

* सरकारने २०१८-२०१९ या वित्तीय वर्षासाठी १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत एमएसपी दीडपटीने वाढ जाहीर केली आहे. तर धानाच्या हमीभावात प्रतिक्विंटल २०० रुपयाची वाढ केली आहे. 

* हमी भाव वाढवल्याने सरकारवर १२,००० कोटी रुपयांचा भार पडणार आहे. तर कर्जबाजारीपणा नापिकीने होरपळलेल्या शेतकऱ्याला यामुळे दिलासा मिळेल. 

* गेल्या दहा वर्षातील पिकांच्या हमीभावातील ही पहिलीच एवढी मोठी वाढ आहे. या निर्णयाचा देशातील सुमारे १२ कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.