गुरुवार, १९ जुलै, २०१८

टेनिसच्या एटीपी मानांकनात जोकोविच पहिल्या १० क्रमांकात - १७ जुलै २०१८

टेनिसच्या एटीपी मानांकनात जोकोविच पहिल्या १० क्रमांकात - १७ जुलै २०१८

* सर्बियाचा माजी टॉप सीडेड टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने रविवारी चौथ्यांदा ग्रँडस्लॅम जेतेपद पटकाविले. या कामगिरीमुळे नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या टेनिस एटीपी रँकिंगमध्ये त्याला पहिल्या दहा खेळाडूला स्थान प्राप्त झाले आहेत.

* एटीपीच्या ताज्या रँकिगनुसार स्पेनचा नदाल ९३१० गुण मिळवत पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर  स्वित्झर्लंडचा फेडरर ७०८०, जर्मनीचा अलेक्झांडर व्हेरेव्ह ५६६५, अर्जेंटिनाचा डेल पोट्रो ५३९५, केव्हिन पीटरसन ४६५५, सिलीच ३९०५, इसनेर ३७२०, थिएम ३६६५, जोकोव्हिच ३३५५ यांच्या गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.

* गेल्या ८ महिन्याच्या कालावधीत जोकोव्हिचला पहिल्या दहा टेनिसपटूमध्ये स्थान मिळविता आले नव्हते. ऑकटोबर २०१७ साली जोकोविच एटीपी मानांकनात पहिल्या स्थानावर होता. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.