सोमवार, १६ जुलै, २०१८

फ्रान्सने जिंकला २०१८ चा विश्वचषक फुटबॉल करंडक स्पर्धा - १३ जुलै २०१८

फ्रान्सने जिंकला २०१८ चा फुटबॉल विश्वचषक करंडक स्पर्धा - १३ जुलै २०१८

* वीस वर्षांपूर्वी मायदेशात विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा जिंकलेल्या फ्रान्सने अखेर विश्वकरंडक विजेतेपदाचा दुष्काळ संपला.

* ले शॉपीयाला फ्रांस चॅम्पियन ही घोषणा खरी करत त्यांनी युरो देशातील आठवी अंतिम लढत ४-२ अशी सहज लढत ४-२ अशी सहज जिंकत चाहत्यांचा आयफेल टॉवरची उंची गाठणारा आनंद दिला.

* मायदेशातील स्पर्धेत विजेतेपद जिंकताना फ्रान्सने क्रोएशियाला उपांत्य फेरीत हरविले होते. यावेळी दोन्ही देशांनी दोन दशकांनी एक पाऊल पुढे टाकले. पण त्याचवेळी निकाल बदलणार नाही याची खबरदारी फ्रान्सने घेतली.

* फ्रान्स आणि क्रोएशिया या अंतिम फेरीतील प्रतिस्पर्ध्यात नव्वद मिनिटांचे अंतर, पण दोघांची फुटबॉलमधील ताकद सारखी. फ्रान्सने आपण अंतिम लढतीत सरस असल्याचे दाखवताना या स्पर्धेत गोल महत्वाचे असतात. वर्चस्व नव्हे हेच दाखवले.

* पूर्वार्धात काहीसे शांत असलेल्या फ्रान्सने उत्तरार्धात आपली ताकद दाखवणारा खेळ केला.  विश्रांतीच्या वेळी फुटबॉल तज्ञ यांच्यात फ्रान्सला पेनल्टी देणे कितपत योग्य होते. याची चर्चा होती.

* लुका मॉड्रीचला गोल्डन बॉल - या स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्या हॅरी केन याला मागे सारत लुका मॉड्रीच गोल्डन बॉलचा मानकरी ठरला. त्याने या स्पर्धेत बेल्जीयमचा एडन हॅझार्ड आणि फ्रान्सचा ऍटोइन ग्रीजमन यांना मागे टाकले.

* तसेच २०१८ च्या फुटबॉल स्पर्धेत गोल्डन हॅरी केन याने एकूण ६ गोल करत गोल्डन बूटचा मानकरी ठरला आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.