बुधवार, ४ जुलै, २०१८

चॅम्पियन ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताला उपविजेतेपद - ४ जुलै २०१८

चॅम्पियन ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताला उपविजेतेपद - ४ जुलै २०१८

* नेदरलँडच्या ब्रेडा शहरात सुरु असलेल्या चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत भारताला अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने पराभूत करत या स्पर्धेचे जेतेपद मिळविले. भारताचा मात्र सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

* ऑस्ट्रेलियाचे चॅम्पियन ट्रॉफीचे हे १५ वे विजेतेपद ठरले. भारताला मात्र इतिहासात एकदाही या स्पर्धेचे विजेतेपद मिळवता आले नाही.

* निर्धारित वेळेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १-१ अशी बरोबरी झाल्यामुळे सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआउटने ठरला ज्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर ३-१ अशी मात केली.

* २०१६ मध्ये लंडन येथे झालेल्या स्पर्धेतही ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत भारतावर पेनल्टी शूटआऊटमध्ये मात केली होती.

* चॅम्पियन ट्रॉफीचे हे यंदाचे अखेरचे वर्ष होते त्यामुळे या स्पर्धेचे विजेतेपद पटकावणे भारतासाठी महत्वाचे आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.