बुधवार, ११ जुलै, २०१८

भारत जगातील ६ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था - ११ जुलै २०१८

भारत जगातील ६ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था - ११ जुलै २०१८

* जागतिक बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारताने फ्रान्सला मागे टाकत जगातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचा मान पटकाविला आहे. या यादीत अमेरिकेने आपले अव्वल स्थान कायम राखल्याचेही स्पष्ट झाले आहे.

* वर्ष २०१७ च्या अखेरीस भारताचे एकूण देशांतर्गत उत्पन्न जीडीपी २.५९ ट्रिलियन होते तर फ्रान्सचे उत्पन्न २.५८ ट्रिलियन डॉलर राहिल्याचे जागतिक बँकेने आपल्या अहवालात म्हटले आहे.

* भारताची लोकसंख्या १ अब्ज ३४ कोटी असून फ्रान्सची ६ कोटी ७० लाख आहे. ही तफावत पाहता भारत अद्यापही फ्रान्सच्या अनेकपटीने मागे आहोत.

* नोटबंदीनंतर काही तिमाहीमध्ये विकासदरात सातत्याने घसरण होत होती. मात्र, उत्पादन आणि ग्राहकांची क्रयशक्ती यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला गती मिळाली.

* जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर म्हणजेच जुलै २०१७ पासून त्यात उल्लेखनीय वाढ झाली. असे जागतिक बँक अहवालात म्हटले आहे.

* आगामी काळात चीनच्या अर्थव्यवस्थेची गती मंदावण्याची शक्यता असून भारत चीनला मागे टाकून आशियातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयाला येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

* जगातील मोठ्या अर्थव्यवस्था व त्यांचा जीडीपी - १] अमेरिका - १९.३९ ट्रिलियन डॉलर, २] चीन - १२.२३ ट्रिलियन डॉलर, ३] जपान - ४.८७ ट्रिलियन डॉलर, ४] जर्मनी - ३.६७ ट्रिलियन डॉलर, ५] ब्रिटन - २.६२ ट्रिलियन डॉलर, ६] भारत २.५९ ट्रिलियन डॉलर, ७] फ्रांस - २.५८ ट्रिलियन डॉलर. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.