बुधवार, २५ जुलै, २०१८

चीनचा आता म्यानमारमधेही आर्थिक कॉरिडॉर - २५ जुलै २०१८

चीनचा आता म्यानमारमधेही आर्थिक कॉरिडॉर - २५ जुलै २०१८

* चीनने पाकिस्ताननंतर म्यानमारमध्येही महत्वाकांक्षी आर्थिक कॉरिडॉर स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. चीन लवकरच यासंबंधीच्या एक करार म्यानमारशी करणार आहे. 

* या कराराचा वरकरणी उद्देश द्विपक्षीय आर्थिक विकासाचा असला तरीही चीन भारताशेजारच्या देशात पायाभूत सुविधांची उभारणी करून भारताला घेरण्याच्या प्रयत्नात आहे, हे स्पष्ट आहे. 

* गंभीर म्हणजे चीनच्या या चालीमुळे भारताचे म्यानमारवरील प्रभुत्व पूर्णतः संपुष्टात येणार आहे. चीन व म्यानमार लवकरच आर्थिक कॉरिडॉर स्थापन करण्याच्या एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणार आहोत. अशी माहिती म्यानमारच्या गुंतवणूक व कंपनी प्रशासनाचे महासंचालक यु आंग नाँग यांनी सांगितले. 

* प्रस्तुत निर्णय म्यानमारमधील पायाभूत सोई सुविधा, दूरसंचार व्यवस्था तथा वाहतूक व शेती क्षेत्राची स्थिती सुधारण्यासाठी करण्यात आलेल्या अन्य मोठ्या करारावर आधारित आहे. असे ते म्हणाले.  

* म्यानमारच्या अनेक भागात जातीय हिंसाचार उफाळून आला आहे. विशेषतः येथील एका मोठ्या गटात चीनविरोधी भावना प्रगल्भ झाली आहे. याशिवाय सरकारलाही या करारामुळे देश चीनच्या ओझ्याखाली दबला जाण्याची भीती आहे. 

* या भीतीपोटीच म्यानमारने यापूर्वी चीनच्या अर्थसाहाय्याने तयार करण्यात येणारे काही प्रकल्प रद्द केले आहेत. त्यामुळे सरकारच्या मनात या आर्थिक कॉरिडॉरपासून दूर राहण्याचा विचार घोळत असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. 

* यासंबंधीच्या वृत्तानुसार प्रस्तुत कॉरिडॉर चीनच्या युआन प्रांताला म्यानमारच्या मंडले, यांगून न्यू सिटी, व क्वाप्यु स्पेशल इकॉनॉमिक झोन सेझ या तीन महत्वाच्या आर्थिक केंद्राशी जोडेल. 

* या कॉरिडॉरच्या माध्यमातून म्यानमारमधील यांगून हिंसाग्रस्त रखाईन राज्यातील दळणवळणही मोठया प्रमाणात सुधारले जाणार आहे. दरम्यान म्यानमार सोबतच्या प्रस्तावित करारामुळे चीनच्या गुंतवणूकीपलीकडे संशयाच्या नजरेतून पाहणे बंद होईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.