रविवार, २९ जुलै, २०१८

उसाच्या रसापासूनच इथेनॉल निर्मितीची साकारकडून निर्मिती - २८ जुलै २०१८

उसाच्या रसापासूनच इथेनॉल निर्मितीची साकारकडून निर्मिती - २८ जुलै २०१८

* सरकारने देशात पर्यायी हरित इंधन निर्मितीस बढावा देण्यासाठी तसेच साखर कारखान्याच्या उद्देशाने साखर कारखान्यांना थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीस परवानगी दिली आहे.

* सरकारने त्यासाठी १९६६ सालच्या साखर कायद्यास सुधारणा केली आहे. यामुळे देशभरातील साखर कारखान्यांना आता मळीपासून नव्हे तर तर थेट उसापासूनच इथेनॉल निर्मिती करता येणार आहे.

* ब्राझील देशात साखर कारखाने थेट उसाच्या रसापासून किंवा बी-हेवी प्रकारच्या मळीपासून इथेनॉल तयार करतात. व डिस्टीलरीज देखील चालवतात. त्याच धर्तीवर भारतीय साखर कारखान्यांना देखील आता इथेनॉल निर्मिती करता येणार आहे.

* सध्या सी-हेवी प्रकारच्या मळीपासून तयार करण्यात आलेल्या इथेनॉलला सरकार प्रतिलिटर ४३.७० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. साखर कारखाने मात्र तेल कंपन्यांना सध्या ४०.८५ रुपये दराने इथेनॉल विकत आहेत.

* यात जिएसटी कराचा समावेश नाही. तेल कंपन्या हे इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी वापरतात. बी-हेवी प्रकारच्या मळीपासून तयार होणाऱ्या इथेनॉलला अधिक दर मिळणार असल्यामुळे साखर कारखाने हरित इंधन निर्मितीकडे वळतील. असे सरकारचे धोरण आहे.

* यामुळे देशात अतिरिक्त साखर उत्पादन होऊन साखरेचा दर कोसळण्याची परिस्थिती उद्भवणार नाही. सध्या ब्राझील देशात ही पद्धत स्वीकारण्यात आली आहे. तेथे साखरेचा दर कोसळला की साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.

* भारतातील साखर कारखाने सामान्यतः सी-हेवी प्रकारच्या मळीपासून इथेनॉलची निर्मिती करतात उसाच्या रसातून साखर काढून घेतल्यानंतर उरलेल्या गाळाला मळी असे म्हणतात.

* सी-हेवी प्रकारच्या मळीमध्ये ५० ते ५२  % साखर असते. तर बी-हेवी प्रकारच्या मळीत ६५ % साखर असते . सामान्यतः एक टन सी-हेव्ही मळीपासून २५० लिटर इथेनॉल  मिळे. तर बी-हेवी मळीपासून ३५० लिटर इथेनॉल मिळू शकते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.