शुक्रवार, ६ जुलै, २०१८

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना १० वर्षाची शिक्षा - ६ जुलै २०१८

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना १० वर्षाची शिक्षा - ६ जुलै २०१८

* पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना १० वर्षांच्या तुरुंगवासाची तर त्याच्या मुलीला अर्थात मरियमला मुलीला ७ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

* तर मुलाला एका वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहेत. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

* लंडन मधील बेहिशेबी मालमत्तेचे हे प्रकरण आहे. या प्रकरणात कोर्टाने नवाज शरीफ यांना ८० लाख पाउंडचा दंड आणि त्यांच्या मुलीला अर्थात मरियम अर्थात मरियमला २ लाख पाउंडचा दंड ठोठावला आहे. भ्रष्टाचार प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

* एव्हनफिल्ड हाऊसमध्ये ४ घरांच्या खरेदी संदर्भातला हा घोटाळा आहे. पाकिस्तानच्या अकाउंटीबिलिटी कोर्टाने नवाज शरीफ आणि त्यांच्या मुलीला भ्रष्टाचार प्रकरणात ही शिक्षा सुनावली आहे.

* लंडनमध्ये नवाज शरीफ यांनी बेकायदेशीररित्या मालमत्ता खरेदी केली. याच प्रकरणात आता त्यांना शिक्षा भोगावी लागणार आहे. नवाज शरीफ यांच्या पत्नीची प्रकृती ठीक नसल्याने ते सध्या लंडनमध्ये आहेत.

* मात्र न्यायालयाने सुनावलेल्या या शिक्षेमुळे त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. इतकेच नाही तर मरियम शरीफ यांचे राजकीय भवितव्यही धोक्यात आले आहे.

* नवाज शरीफ आणि त्यांच्या मुलाविरोधात न्यायालयात भ्रष्टाचाराची चार प्रकरणे सुरु आहेत. पनामा पेपर प्रकरणी मागील वर्षी पाकिस्तानच्या उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यावर नॅशनल अकाउंटीबिलिटी कोर्टात याचिका दाखल केली होती.

* पनामा पेपर प्रकरणात आलेल्या निर्णयानंतर शरीफ यांना त्यांचे पंतप्रधान गमवावे लागले. आता त्यांना १० वर्षाचा तुरुंगवास सुनावण्यात आल्याने त्यांच्या मुलीच्या अडचणीत भर पडली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.