सोमवार, १६ जुलै, २०१८

भारतीय अर्थव्यवस्था २०१३ मध्ये १० हजार अब्ज डॉलरची होणार - १५ जुलै २०१८

भारतीय अर्थव्यवस्था २०१३ मध्ये १० हजार अब्ज डॉलरची होणार - १५ जुलै २०१८

* भारतीय अर्थव्यवस्था नवी उंची गाठण्यासाठी तयार आहे. त्यासोबतच २०३० पर्यंत १० हजार अब्ज डॉलरच्या जीडीपीसह जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था बनण्याची अपेक्षा आहे. असे मत आर्थिक विषयाचे सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी व्यक्त केले.

* जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार वर्ष २०१७ मध्ये भारत २,५९० अब्ज डॉलरच्या जीडीपीसह जगातील ६वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश झाला आहे.

* गर्ग यांच्या मते २०२० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था बनण्याची अपेक्षा आहे. तर २०३० पर्यंत डिजिटल अर्थव्यवस्था एकूण अर्थव्यवस्थेच्या अर्धी होईल.

* स्वातंत्र्यानंतर पहिल्या ४० वर्षात देशाची आर्थिक वृद्धी मोठ्या मुश्किलीने ३ ते ४ टक्के होती. ती आज ७ ते ८ टक्के आहे. अर्थव्यवस्थेच्या पातळीवर चांगले काम होत आहे. त्यामुळे भारताची आर्थिक वाढ होणे शक्य आहे.

* २०३० पर्यंत आम्ही १० हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था होण्याची अपेक्षा करू शकतो. हे एक आव्हान आहे. तसेच आमच्यासाठी एक संधी आहे. ८% विकास दर गाठला जाऊ शकतो. जर आम्ही हे लक्ष्य साध्य केले. तर १० हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था होण्याची अपेक्षा आम्ही करू शकतो.

* त्यावेळी भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याची अपेक्षा आम्ही करू शकतो. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.