सोमवार, १६ जुलै, २०१८

अँजेलिक केर्बरला ग्रँड स्लॅम विजेतेपद - १२ जुलै २०१८

अँजेलिक केर्बरला ग्रँड स्लॅम विजेतेपद - १२ जुलै २०१८

* अमेरिकेची मातब्बर टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिला मातृत्वानंतर ग्रँडस्लॅम विजेतेपद संपादन करण्यासाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागली.

* अशा यशाची सर्वोत्तम संधी असलेल्या विम्बल्डनमध्ये महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात तिला जर्मनीच्या अँजेलिक केर्बरने हरविले.

* डावखुऱ्या केर्बरने दोन सेटमध्ये विजय मिळवीत हा बहुचर्चित सामना एकतर्फी ठरविला. तिने सेरेनाला दीर्घ रॅलीज खेळण्यास भाग पाडले. त्यात सेरेनाकडून सोपे फटके चुकले. हा सामना एक तासाचा एक तास ५ मिनिटे चालला.

* अँजेलिकचे पहिलेवहिले विबल्डन जेतेपद, अँजेलिकचे तिसरे ग्रँड स्लॅम विजेतेपद, यापूर्वी २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियन व अमेरिकन जेतेपद.

* सेरेना विबल्डनात सात वेळा विजेती, २४ व्या ग्रँड स्लॅम जेतेपदाची प्रतिक्षाही लांबली, गेल्या सप्टेंबरमध्ये मुलगी ऑलिंपियाला जन्म दिल्यानंतर सेरेनाची चौथीच स्पर्धा होती. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.