गुरुवार, ५ जुलै, २०१८

राज्य सरकारची पुढील महिन्यात ३६ हजार जागांची भरती - ५ जुलै २०१८

राज्य सरकारची पुढील महिन्यात ३६ हजार जागांची भरती - ५ जुलै २०१८

* महाराष्ट्र सरकारने ज्या ७२ हजार जागांची भरती करण्याचे ठरविले आहे. त्यापैकी ३६ हजार जागा पुढील महिन्यात भरण्यात येणार असून त्यासाठी या महिन्याच्या अखेरीस जाहिराती देण्यात येणार आहेत.

* या जागांसाठीच्या परीक्षा राज्य सरकारच्या महापोर्टलद्वारे एकाच दिवशी घेण्यात येतील असे संकेतस्थळांचे वृत्त आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या सूत्रांच्या मते कृषी, ग्रामविकास, गृह, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, जलसंपदा, मृदु व जलसंधारण या विभागांची भरती पहिल्या टप्प्यात होईल.

* त्यासाठी प्रत्येक विभाग प्रमुखांनी आपल्याकडील रिक्त जागांची माहिती १७ जुलैपर्यंत कळवायची आहे. त्यानंतर त्यासाठीच्या जाहिराती प्रसिद्ध होतील. सरकारने सर्व विभागाकडून खातेनिहाय रिक्त जागांची माहिती मागवणे सुरु केले आहे.

* भरतीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, विभागीय स्तरावर विभागीय आयुक्त व राज्य स्तरावर त्यांच्या विभाग प्रमुख यांची समिती असेल. परीक्षेसाठी त्यांच्या जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, स्थानिक बाबीवर २५ टक्के गुण असतील. गट क व गट ब या संवर्गातील सर्व रिक्त पदासाठी भरती होईल.

* ३६ हजार पदांमध्ये ग्रामविकास विभागातील ११ हजार, सार्वजनिक आरोग्य विभागातील १० हजार ५६८ पदे, गृह विभागातील ७ हजार १११ पदे, कृषी विभागातील २ हजार ५७२ पदे, पशुसंवर्धन विभागातील १ हजार ४७ पदे, सार्वजनिक बांधकाम ८३७ पदे, जलसंपदा विभागातील ८२७ पदे, जलसंधारण विभाग ४२३ पदे, मत्स्यव्यवसाय विकास ९०, नगरविकास विभाग १ हजार ६६४ पदे.
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.