रविवार, २९ जुलै, २०१८

भारताचा स्टार भालाफेकीपटू नीरज चोप्राला सुवर्णपदक - २८ जुलै २०१८

भारताचा स्टार भालाफेकीपटू नीरज चोप्राला सुवर्णपदक - २८ जुलै २०१८

* भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याने फिनलँडमधील सावो गेम्समध्ये रविवारी सुवर्णपदक पटकावले. आपल्या कौशल्यपूर्ण खेळीने त्याने चीन तैपेईच्या चाओ सून चेंगचा पराभव केला.

* ८५.६९ मीटर अंतरावर भालाफेक करून त्याने हे सुवर्णपदक मिळवून दिले आहे. तर या स्पर्धेत चेंगला ८२.५२ मीटरपर्यंत भालाफेक करीत दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागेल.

* २३ वर्षीय चेंग हा एकमेव आशियाई खेळाडू आहे. ज्याने ९० मीटरपेक्षा पुढे भालाफेक करीत विक्रम नोंदविला आहे. त्याने चीन तैपेईत गेल्या वर्षी झालेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये त्याने ८९.१५ अंतरावर भालाफेकत विक्रम नोंदविला.

* नीरजने यापूर्वी मे महिन्यात दोहा येथे झालेल्या डायमंड लीग मिटिंगमध्ये ८७.४३ मीटर भालाफेक वैयक्तिक सर्वोत्कृष्ट आणि राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.