बुधवार, ४ जुलै, २०१८

विशेष चालू घडामोडी - ४ जुलै २०१८

विशेष चालू घडामोडी - ४ जुलै २०१८

* आधार कार्डचे तपशील सुरक्षित करण्यासाठी एप्रिलमध्ये सादर करण्यात आलेल्या व्हर्च्युअल आयडीची व्हीआयपी अंमलबजावणी १ जुलैला सुरु झाली.

* अमेरिकेने आयात कर वाढविल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून आता कॅनडानेही अमेरिकी वस्तूवर आयात कर लादला आहे.

* हरमीत सिंग पाकिस्तानातील पहिले शीख वृत्तनिवेदक ठरले आहेत. पब्लिक न्यूज या वाहिनीवर ते वृत्तनिवेदक म्हणून रुजू झाले आहेत.

* देशातील हरविलेल्या मुलांना शोधून काढण्यात उपयुक्त ठरणाऱ्या 'रियूनाइट' ऍपचे केंद्रीय वाणिज्य व उद्योग आणि नागरी पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी अनावरण केले.

* फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सने एफटीएफ भारताविरोधी कारवायांसाठी दहशवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानचा समावेश ग्रे लिस्ट म्हणजेच संशयित देशांच्या यादीत केला आहे.

* भारतीय अंतराळ संशोधन संघटना इस्रो चंद्रावरील पुढील स्वारी अणुइंधन म्हणून वापरता येऊ शकेल, अशा हेलियम ३ या दुर्मिळ मूलद्रव्याचा शोध घेण्यासाठी असणार आहे.

* स्विस नॅशनल बँकेने जाहीर केलेल्या अहवालानुसार भारतीयांच्या स्विस बँकांमधील खात्यातील रकमेत सुमारे ५०% वाढ झाली आहे.

* विज्ञान कादंबरी क्षेत्रातील प्रभावी लेखक हार्लन एलिसन यांचे २८ जून रोजी निधन झाले.

* गुजरातमधल्या बेने इस्त्रायली अर्थात ज्यू समुदायाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री विजय रूपांनी यांनी घोषित केला आहे.

* दुसऱ्या महायुद्धानंतर दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये आलेले अमेरिकन सैन्य आता अधिकृतरीत्या बाहेर पडणार आहे. सलग ७ दशके अमेरिकन सैन्य सेऊलमध्ये ठेवण्यात आलेले होते.

* ऑस्ट्रलियाचा कर्णधार आणि सलामीवीर ऍरॉन फिंचने येथे सुरु असलेल्या तिरंगी मालिकेत झिम्बॉबे विरुद्धच्या २०-२० सामन्यात १७२ धावा करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या आहे.

* भारताचे माजी नौदलप्रमुख ऍडमिरल जयंत गणपत नाडकर्णी यांचे २ जुलै रोजी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.

* भारतीय संघाचा संघाचा माजी खेळाडू आणि द वॉल असं बिरुद मानणाऱ्याराहुल द्रविडला आयसीसीच्या 'हॉल ऑफ ऑफ फेम' मध्ये समावेश करण्यात आला आहे. याच्या आधी बिशनसिंह बेदी, कपिल देव, सुनील गावस्कर, आणि अनिल कुंबळे या खेळाडूचा यात समावेश आहे.

* देशात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेत मराठीने तेलगू भाषेला मागे टाकत आता मराठी भाषा आता तिसऱ्या स्थानी पोहोचली आहे.

* जागतिक बाजारात हळदीचे दर निश्चित करणाऱ्या सांगलीच्या हळदीला भौगोलिक मानांकन मिळाले आहे. याची मागणी २०१३ पासून सुरु होती.

* अमेरिकेने भारत, चीन व मित्रपक्षांना इराणकडून तेल आयात न करण्याचे आवाहन केले आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.