मंगळवार, १० जुलै, २०१८

काही नवीन चालू घडामोडी - १० जुलै २०१८

काही नवीन चालू घडामोडी - १० जुलै २०१८

* पार्किन्सन म्हणजे कंपवाताच्या रोगावरील औषधांच्या संशोधनात सिंहाचा वाटा उचलणारे नोबेल विजेते स्वीडिश वैज्ञानिक डॉ अरविंद कार्लसन यांचे २९ जून रोजी निधन झाले. 

* आफ्रिकेतील केनिया देशाच्या मकेना ओनजेरीका या तरुणीने साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा केन पुरस्कार मिळविला होता.

* काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मेघालयाचे माजी राज्यपाल एम. एम.  जेकब यांचे केरळच्या कोट्टायम येथे ८ जुलै रोजी निधन झाले. ते ९२ वर्षाचे होते.

* केंद्र सरकारने स्ट्रॅटजीक पेट्रोलियम रिझर्व्ह म्हणजेच एसपीआर कच्च्या तेलाचा तुटवड्याच्या वेळेस वापरता येईल असा साठा वाढविण्याचा निर्णयाला तत्वतः मंजुरी दिली आहे.

* भारतीय वंशाचे वैज्ञानिक प्रा रविंदर दहिया यांच्या अतिसंवेदनशील कुत्रिम त्वचा तयार करण्याच्या 'ब्रेनी स्किन' या प्रकल्पाला १५ लाख पौंडांचे अर्थसाहाय्य मिळाले आहे.

* भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद २००० धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे.

* रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी शेअरधारकांनी मुकेश अंबानी यांना एप्रिल २०१९ पासून पुढील ५ वर्षासाठी मुदतवाढ दिली आहे.

* मराठी उद्योजकांना नवी दिशा देणारे सॅटर्डे क्लबचे संस्थापक माधव भिडे यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले.

* महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेशातही योगी आदित्यनाथ सरकारने १५ जुलैपासून प्लॅस्टिक बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

* पत्रकारांसाठी मासिक पेन्शन योजना सुरु करावी या गेल्या अनेक वर्षांपासून मागणीला अखेर राज्य शासनाची मंजुरी मिळाली आहे.

* गुंतागुंतीच्या प्रकरणामध्ये न्याय प्रक्रिया सुरळीत आणि नेमकी व्हावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर भर देत केंद्र सरकारने डीएनए तंत्रज्ञान विधेयकाला मंजुरी दिली आहे.

* सरकारी बँकांच्या वाढत्या थकीत कर्जाची समस्या सोडविण्यासाठी सुनील मेहता यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सरकारकडे पंचसूत्री आराखडा सादर केला आहे.

* केरळ सरकारने प्लॅस्टिक कचऱ्यातून रस्तेबांधणी करण्यासाठी विशेष योजना आखली आहे. शुचित्व सागरम समुद्र स्वच्छ करणे असे या योजनेचे नाव आहे.

* स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात साईमध्ये काही बदल होणार असून या बदलानुसार साई आता स्पोर्ट्स इंडिया या नावाने ओळखले जाईल.

* उत्तराखंड उच्च न्यायालयाने हवा, पाणी आणि जमिनीवर राहणारे विविध पशु, पक्षी आणि जलचर प्रजातींना कायदेशीर व्यक्तीचा दर्जा दिला आहे.

* मलेशियाचे माजी पंतप्रधान नजीब रझाक यांना पदाचा गैरवापर आणि राज्य विकास निधी भ्रष्टाचार प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

* पाकिस्तानचा ज्येष्ठ क्रिकेटपटू शोएब मलिक टी-२० क्रिकेटमध्ये २००० धावांचा पल्ला गाठणारा पहिला आशियाई खेळाडू ठरला आहे.

* विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत रशियाकडून झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत स्पेनच्या आंद्रेस एनीइस्टाने आंतरराष्ट्रीय  फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

* भारतीय वंशाच्या तरुण लेखीका प्रीती तनेजा यांच्या 'वुई दॅट आर यंग' या पुस्तकाला डेसमंड एलियट पुरस्कार मिळाला आहे.

* भारताचे माजी नौदलप्रमुख ऍडमिरल जयंत गणपत नाडकर्णी यांचे २ जुलै रोजी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.

* ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ऍरोन फिंचने झिम्बोंबेविरुद्ध टी-२० लढतीमध्ये १७२ धावांची तुफानी खेळी साकारत विश्वविक्रम रचला आहे. टी-२० क्रिकेटमधील ही सर्वाधिक धावांची खेळी आहे.

* आप की अदालत या कार्यक्रमाद्वारे घराघरात पोहोचलेले पत्रकार रजत शर्मा यांची दिल्ली जिल्हा क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

* राजस्थान सरकारकडून गुर्जर समाजासह गाडरिया, रेबारी, गाडिया लोहार, आणि बंजारा या ५ जातींना अतिमागास प्रवर्गात १ टक्का आरक्षणाला मंजुरी देण्यात आली आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.