बुधवार, २५ जुलै, २०१८

आयडिया आणि वोडाफोन विलीनीकरणाला केंद्राचा हिरवा कंदील - २४ जुलै २०१८

आयडिया आणि वोडाफोन विलीनीकरणाला केंद्राचा हिरवा कंदील - २४ जुलै २०१८

* दूरसंचार क्षेत्रातील आयडिया आणि वोडाफोन या दोन कंपन्यांच्या विलीनीकरणाला असलेला केंद्र सरकारचा अडसर दूर होण्याच्या मार्गावर आहे.

* उभय कंपन्यांनी सरकारने मागणी केल्याप्रमाणे ७,२४८.७८ कोटी रुपये जमा करण्याची तयारी दर्शविली आहे.

* हे विलीनीकरण मार्गी लावायचे तर केंद्रीय दूरसंचार विभागानेच ही रक्कम आधी भरण्याची पूर्वअट उभय कंपन्यांवर घातली होती.

* काहीशा नाराजी आणि विरोध नमूद करीतच कंपन्यांनी अखेर ही रक्कम जमा केली आहे. सरकारकडे जमा करावयाच्या एकूण रकमेपैकी ३,९२६.३४ कोटी रुपये रोखीने जमा करण्यात आले असून उर्वरित ३,३२२.४४ कोटी रुपये हे बँक हमी म्हणून मान्य करण्यात आले आहे.

* आयडीआय सेल्युलरने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. रक्कम जमा होत नाही तोपर्यंत विलीनीकरणाला मंजुरी मिळणार नाही. असे दूरसंचार विभागाने यापूर्वी स्पष्ट केले होते.

* एकत्रित नव्या कंपनीत वोडाफोनचा ४५.१ टक्के तर आदित्य बिर्ला समूहाचा २६ टक्के आणि समूहातील आयडिया सेल्युलरच्या भागधारकांना २८.९ टक्के हिस्सा असेल.

* आयडिया-वोडाफोनच्या एकत्रीकारणानंतर ४३ कोटी ग्राहकसंख्येद्वारे देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी अस्तित्वात येणार आहे.

* ३५ टक्के बाजार हिश्श्यासह उभय कंपन्यांनी एकत्रित मालमत्ता १.५० लाख कोटी रुपये होणार आहे. यामुळे भरती एअरटेलचे भारताच्या दूरसंचार क्षेत्रात ग्राहकसंख्येत अव्वल स्थान धोक्यात आले आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.