शुक्रवार, २० जुलै, २०१८

भारताच्या दिव्याला आशियाई कुमार स्पर्धेत रौप्यपदक - १९ जुलै २०१८

भारताच्या दिव्याला आशियाई कुमार स्पर्धेत रौप्यपदक - १९ जुलै २०१८

* कुमार गटाच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताने तिसऱ्या दिवशी मुलीच्या गटात १ रौप्य आणि दोन ब्राँझ अशी तीन गुणांची कमाई केली. मुलीच्या गटात वर्चस्व जपाननेच राहिले. त्यांनी ३ सुवर्णपदके मिळविली.

* भारताची दिव्या ६८ किलो वजनी गटात रौप्य, तर ५५ किलो आणि करुणा पाटील ७६ किलो ब्राँझपदकाच्या मानकरी ठरल्या. दिव्याला चांगली कामगिरी केल्यानंतरही ६८ किलो वजनी गटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

* रिनाने ५५ किलो वजनी गटात ब्राँझपदकाची कमाई केली. नॉर्डिक पद्धतीने झालेल्या ७६ किलो वजनी गटात करुणा पाटील ब्राँझपदकाची मानकरी ठरली.

* शिवानीला ब्राँझपदकाची संधी होती. मात्र ५० किलो वजनी गटात ती ब्राँझपदकाच्या लढतीत कझाकिस्तानच्या मरिनाकडून चितपट झाली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.