सोमवार, ३० जुलै, २०१८

आसाममध्ये ४० लाख नागरिक बेकायदा - ३० जुलै २०१८

आसाममध्ये ४० लाख नागरिक बेकायदा - ३० जुलै २०१८

* आसाममध्ये आज जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या एनआरसी यादीनुसार राज्यात सुमारे ४० लाख लोक बेकायदा असल्याचे घोषित करण्यात आले आहे. 

* आसाममध्ये ३ कोटी २९ लाख ९१ हजार ३८४ लोकांनी नोंदणीसाठी अर्ज केला होता. त्यापैकी २ कोटी ८९ लाख ८३ हजार ६७७ लोक कायदेशीर असून, ४० लाख ७ हजार ७०७ लोकांना बेकायदा घोषित करण्यात आले आहे.  

* त्यामुळे आसाममध्ये घुसखोरी केलेल्या आणि नागरिकता सिद्ध करू न शकलेल्या या ४० लाख लोकांचे भवितव्य अधांतरी लटकले आहे. अनेक जिल्ह्यात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याने जमावबंदी लागू करण्यात आली.

* दरम्यान हा मसुदा अंतिम नसून ज्यांना त्यावर आक्षेप आहे. ते लोक तक्रार करू शकतात. ज्यांचे नाव या यादीत आले नाही. ते लोक पुन्हा अर्ज करू शकतात असे एनआरसीच्या अधिकाऱ्याने सांगितले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.