शुक्रवार, २७ जुलै, २०१८

पाकिस्तान सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांच्या पक्षाचा विजय - २६ जुलै २०१८

पाकिस्तान सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांच्या पक्षाचा विजय - २६ जुलै २०१८

* पाकिस्तानच्या सत्ता सिंहासनासाठीचा अंतिम सामना जिंकल्याचा दावा आज माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ [पीटीआय] पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांनी केला. 

* त्यांच्या पक्षाने आतापर्यंतच्या मतमोजणीत १२० जागा मिळवल्या आहेत. सत्तेच्या जवळ पोचतात इम्रान यांनी भारतविरोधात गरळ ओकली असून काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा कांगावा करत त्यांनी चीनशी लगट करण्याचा प्रयत्न केला. 

* भविष्यामध्येही आम्ही चीनची मदत घेतच राहू अशी भारतविरोधी भूमिका त्यांनी जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात घेतली. 

* पाकिस्तानच्या नॅशनल असेम्ब्लीतील एकूण सदस्य संख्या ३४२ सदस्य असून, त्यातील २७२ जागांवरील प्रतिनिधी थेटपणे निवडले जातात. साठ जागा या महिलांसाठी राखीव असतात. 

* या निवडणुकीत इम्रान खानच्या पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ या पक्षाने एकूण १२० जागा मिळवल्या आहेत. तर पाकिस्तान मुल्सिम लीग नवाज शरीफ यांच्या पक्षाने ६१ जागा जिंकल्या आहेत. तर पाकिस्तान पीपल्स पार्टी यांच्या पक्षाने ४० जागा जिंकल्या आहेत. तर अपक्षाने ५१ जागा जिंकल्या आहेत. 
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.