बुधवार, ४ जुलै, २०१८

राज्यात कन्या वन समृद्धी योजनाची अंमलबजावणी - २ जुलै २०१८

राज्यात कन्या वन समृद्धी योजनाची अंमलबजावणी - २ जुलै २०१८

* महिला सक्षमीकरण व सबलीकरणासोबत वृक्ष लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कन्या वन समृद्धी योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली. 

* पर्यावरण संवर्धनासोबतच महिला सक्षमीकरणही साधले जावे, यासाठी वन विभागातर्फे ही विशेष योजना तयार करण्यात आली. 

* या योजनेअंतर्गत मुलगी जन्माला येणाऱ्या शेतकरी कुटुंबास वृक्ष लागवडीसाठी सरकारकडून मदत केली जाणार आहे. या योजनेचा लाभ दरवर्षी दोन लक्ष शेतकरी कुटुंबाना होईल. असा अंदाज आहे. 

* या योजनेअंतर्गत मुलगी जन्माला येणाऱ्या शेतकरी कुटुंबाला सरकारकडून साग, आंबा, फणस, जांभूळ, व चिंच अशी झाडांची १० रोपे विनामूल्य देण्यात येणार आहेत. 

* या झाडापासून मिळणारे उत्पन्न मुलीचे भवितव्य घडविण्यासाठी वापरणे अपेक्षित आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त दोन मुलीसाठीच दिला जाईल. 

* या योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण संदेश देण्यासह मुलीच्या घटत्या संख्येवर काही प्रमाणात नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.