रविवार, २२ जुलै, २०१८

१०० वस्तूवरील जीएसटीसाठी कमी कर - २१ जुलै २०१८

१०० वस्तूवरील जीएसटीसाठी कमी कर - २१ जुलै २०१८

* वस्तू आणि सेवाकर परिषदेने जीएसटी आज कॉमन मॅनला दिलासा देत १०० वस्तूवरील कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सॅनिटरी नॅपकिनसह हस्तकलेच्या वस्तुंना जीएसटीतून वगळण्यात आले असून पादत्राणे, फ्रिज, वॉशिंग मशीन, लहान स्क्रीनचे टीव्ही यांच्यावरील करातही मोठी कपात करण्यात आली.

* जीएसटी कॉन्सिलने तब्बल जीवनावश्यक वस्तूवरील कराला कात्री लावली आहे. दैनंदिन वापरातील परफ्युम, सौन्दर्य प्रसाधने, स्वच्छतागृहामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू, हेअर ड्रायर्स, शेव्हर, व्हॅक्युम क्लिनर, लिथियम बॅटरी अशा २८ टक्क्यावरून १८% कमी करण्यात आला.

* हे सुधारित दर २७ जुलैपासून लागू होतील. मध्यमवर्गाना लाभ व्हावा म्हणून या जीवनावश्यक वस्तूवरील कर कमी केला जावा, अशी प्रत्येक राज्याची इच्छा होती. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.