गुरुवार, १२ जुलै, २०१८

राज्य सरकारकडून ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर - ११ जुलै २०१८

राज्य  सरकारकडून ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर - ११ जुलै २०१८

* ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक उन्नती, ताण तणावातून मुक्त उत्तम आरोग्यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष विभागाने ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केले असून त्याच्या चोख अंमलबजावणीसाठी संबंधित सर्व विभागांना सक्तीचे निर्देश दिले आहेत.

* सर्व योजनांच्या लाभासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची मर्यादा ६५ वरून ६० वर्षे करण्यात आली आहे. अशी माहिती सामाजिक व न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.

* ते म्हणाले ज्येष्ठ धोरणानुसार वैद्यकीय महाविद्यालयांशी संबंधित रुग्णालयामध्ये ज्येष्ठासाठी ५ % खाटांची योग्य सोय ठेवण्यात आली असून शासकीय रुग्णालयात त्यांना प्राधान्यक्रम देण्यात आला.

* खासगी वैद्यकीय संस्था रुग्णालये, ट्रस्टानी ज्येष्ठ रुग्णांना ५०% सवलत देण्याचे तसेच खासगी वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी ज्येष्ठाना फीमध्ये सवलत द्यावी असे निर्देश दिले असल्याचेही बडोले यांनी सांगितले.

* सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमात वृद्ध चिकित्सा या मुद्याचा समावेश करण्यात आला असून वैद्यकीय सेवा व मानसशास्त्रीय उपचार आणि समुपदेशन करण्यासाठी व्यवसायिक अथवा सामाजिक कार्यकर्त्यांची नेमणूक करण्यात येणार आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.