सोमवार, ३० जुलै, २०१८

रशियन बॅडमिंटन स्पर्धेत सौरभ वर्माला सुवर्णपदक - २९ जुलै २०१८

रशियन बॅडमिंटन स्पर्धेत सौरभ वर्माला सुवर्णपदक - २९ जुलै २०१८

* भारताच्या सौरभ वर्माने यंदाच्या मौसमातील पहिल्या जेतेपदाला गवसणी घातली. अंतिम सामन्यात जपानच्या कोकी वॅटनेचा पराभव करून रशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला.

* सौरभने अंतिम लढतीत १८-२१, २१-१२, २१-१७ अशा फरकाने विजय मिळविला. दुसरीकडे मिश्र दुहेरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या रोहन कपूर आणि कुहू गर्ग या जोडीला उपविजेते पदांवर समाधान मानावे लागले.

* जागतिक क्रमवारीत ६५ व्या स्थानावर असलेल्या सौरभला पहिला गेम १८-२१ असा गमवावा लागला. या गेममध्ये गुणसंख्या १८-१८ अशी समसमान होती.

* याच स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एका पदाची भर पडली. रोहन कपूर आणि कुहू गर्ग या जोडीने मिश्र दुहेरीचे रौप्यपदक जिंकले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.