शुक्रवार, २० जुलै, २०१८

आशियाई देशात सर्वोत्तम विकास दराचे कयास - १९ जुलै २०१८

आशियाई देशात सर्वोत्तम विकास दराचे कयास - १९ जुलै २०१८

* सरकारकडून पायाभूत प्रकल्पावर खर्चातील वाढ, क्षमतेचा वाढता वापर तसेच खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीचे वाढते प्रमाण याच्या जोरावर भारत ही वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून कायम राहणार असल्याचा आशावाद आशियाई विकास बँक [एडीबी] ने व्यक्त केला आहे.

* २०१९ वित्त वर्षात देशाचा विकास दर शेजारच्या चीनपेक्षा अधिक ७.३ टक्के नोंदला जाईल. असाही तिचा कयास आहे.

* वर्ष २०१८-१९ मध्ये विकास दर ७.३ टक्के असेल. असे नमूद करताना पुढील २०१९-२० या वर्षात हा दर ७.६ टक्के असेल. असे एडीबीने म्हटले आहे.

* चिनी अर्थव्यवस्थेचा वेग या दोन्ही वर्षात अनुक्रमे ६.६ व ६.४ टक्के असेल. असे नमूद करण्यात आला आहे. एकूण आशियातील खंडातील देशांचा विकास आढावा घेताना आशियाई विकास बँकेने भारताबाबत खुपचा आशावाद व्यक्त केला आहे.

* भारतीय व्यवस्थेतील आर्थिक सुधारणांना योग्य तो परिणाम दृष्टीक्षेपात असून गेल्या वित्त वर्षात राहिलेला भारताचा ७.३ टक्के विकास दर चालू वर्षात कायम असेल. असे स्पष्ट करण्यात आले.

* पुढील वित्त वर्षात प्रामुख्याने बँकिंग सुधारणामुळे तो अधिक विस्तारात ७.६ पेरण्यात जाईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.