बुधवार, ४ जुलै, २०१८

मुंबई देशातील सर्वात महागडे शहर - ३ जुलै २०१८

मुंबई देशातील सर्वात महागडे शहर - ३ जुलै २०१८

* न्यूयॉर्कच्या इंटरनॅशनल कन्स्लटिंग फर्म मर्सरच्या अहवालानुसार देशाच्या आर्थिक राजधानीने मुंबई शहर हे देशातील सर्वात महागडे शहर ठरले आहे.

* मर्सरच्या कॉस्ट ऑफ लिव्हिंगने २०१८ मध्ये या संदर्भात केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

* जगातील एकूण २०९ प्रमुख शहरामध्ये हा सर्व्हे करण्यात आला आहे. प्रत्येक शहरातील २०० वस्तूंच्या दरांची तुलना करून त्याआधारावरच या शहरांची महागडे शहर म्हणून क्रमवारी निश्चित करण्यात आली आहे.

* २०० वस्तूमध्ये प्रामुख्याने शेती उत्पादने, दूध उत्पादने, अवजड उत्पादने या उत्पादनाचे त्या त्या शहरातील असणारे दर तपासून पाहण्यात आले.

* जागतिक पातळीवर राहण्यासाठी महागड्या असणाऱ्या शहरामध्ये संपूर्ण जगात हाँगकाँग हे शहर सर्वात महागडे शहर ठरले आहे.

* देशात पहिल्या क्रमांकावर असलेल्या मुंबईचा जगातील यादीत मात्र ५५ वा क्रमांक आहे. दिल्ली १०३, चेन्नई १४४, बंगळुरू १७० तर कोलकाता १८२ व्या स्थानावर आहे.

* या सर्वेक्षणामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या भारतीय शहरामध्ये महागाईचा दर ५.५७ टक्के नोंदविण्यात आला आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.