गुरुवार, २६ जुलै, २०१८

सोनम वांगचुक रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर - २६ जुलै २०१८

सोनम वांगचुक रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर - २६ जुलै २०१८

* रियल लाईफमध्ये फुंगसुक वांगडू म्हणजेच सोनम वांगचुक यांना यंदाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी लडाखसारख्या दुर्गम भागात वांगचुक यांनी शिक्षण, विज्ञानसारख्या क्षेत्रात आमूलाग्र बदल केले आहेत.

* सोनम वांगचुक यांनी लडाखसारख्या दुर्गम भागात शिक्षण पद्धती कल्पक बदल केले, पाणी टंचाईवर मात करणारे ice stupa बनविले, लाखो लोकांना-मुलांना प्रयोग करण्याची innovation ची प्रेरणा त्यांनी दिली. सोनम वांगचुक यांच्या बरोबरीने डॉक्टर भारत वाटवानी यांची सुद्धा रॅमन मॅगसेसे पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

* सोनम वांगचुक आणि भारत वाटवानी या दोन भारतीयांना यंदाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. मॅगसेसे पुरस्कार आशिया खंडातील नोबेल पुरस्कार समजला जातो.

* सोनम वांगचुक यांनी १९८८ साली इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतल्यानंतर लडाख सारख्या दुर्गम प्रदेशात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुरु केला. त्यावेळी लडाखमध्ये ९५% विद्यार्थी सरकारी परीक्षांमध्ये नापास व्हायचे.

* १९९४ साली त्यांनी शैक्षणिक सुधारणासाठी ऑपरेशन न्यू होप हा कार्यक्रम सुरु केला. या कार्यक्रमाअंतर्गत त्यांनी आतापर्यंत ७०० शिक्षकांना प्रशिक्षित केले आहे. त्याचा परिणाम असा झाला कि १९९६ साली लडाखमध्ये दहावीच्या परीक्षेत विद्याथ्यांचे पास होण्याचे प्रमाण फक्त ५% होते तेच २०१५ साली विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली. असे त्यांचे महान कार्य आहेत.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.