सोमवार, १६ जुलै, २०१८

नोव्हाक जोकोविच विम्बल्डन पुरुष एकेरीचे विजेतेपद - १५ जुलै २०१८

नोव्हाक जोकोविच विम्बल्डन पुरुष एकेरीचे विजेतेपद - १५ जुलै २०१८

* सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने कोपरावरील शस्त्रक्रियेनंतर पुनरागमनाची मोहीम यशस्वी केली. विम्बल्डनमध्ये मॅरेथॉन लढा दिलेल्या केव्हिन अँडरसनला हरवून त्याने पुरुष एकेरीचे विजेतेपद संपादन केले.

* याबरोबरच जोकोविचने ग्रँड स्लॅम यशाची चाहत्यांना अपेक्षापूर्ती केली. अँडरसनने उपांत्यपूर्व फेरीत रॉजर फेडररला हरविले होते. त्यानंतर उपांत्य फेरीत त्याला अमेरिकेच्या जॉन इजनरविरुद्ध सहा तास ३६ मिनिटे झुंजावे लागले.

* जोकोव्हिचच्या कारकिर्दीतील १३ वे ग्रँडस्लॅम विजेतेपद, २५ महिन्याच्या खंडानंतर प्रथमच ग्रँड स्लॅम विजेता, याआधीच जेतेपद २०१६ मध्ये फ्रेंच ओपन, विम्बल्डनमध्ये चौथ्यादा विजेता, यायाधी २०११, १४ व १५ साली त्याला विजेतेपद.

* या दोघांमधील सामना ६-२, ६-२, ७-६ असा खेळण्यात आला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.