मंगळवार, २४ जुलै, २०१८

आशियाई कुमार कुस्ती स्पर्धेत सचिन व दीपकला सुवर्णपदक - २३ जुलै २०१८

आशियाई कुमार कुस्ती स्पर्धेत सचिन व दीपकला सुवर्णपदक - २३ जुलै २०१८

* आशियाई कुमार कुस्ती स्पर्धेतील सुवर्णदुष्काळ रविवारी अखेरच्या दिवशी सचिन राठी आणि दीपक पुनिया यांनी संपवला. फ्रीस्टाईल प्रकारात तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यावर चमकदार विजय मिळवून सचिनने ७४ किलो, तर दिपकने ८६ किलो वजन गटात सुवर्णपदकाची कमाई केली.

* सचिन राठीने ७४ किलो गटात भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. विजेतेपदाच्या लढतीत त्याच्यासमोर मंगोलियाच्या बकईर्डेन याने सुरवातीलाच ४ गुण मिळवून आक्रमक सुरुवात केली.

* दीपक पुनियाने आपला लौकिक राखत भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. दीपकने यापूर्वी २०१६ मध्ये आशियाई कॅडेट आणि आशियाई कुमार स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली. त्यानंतर २०१७ मध्ये पुन्हा एकदा या दोन्ही स्पर्धेत तो रौप्य पदकाचा मानकरी ठरला.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.