सोमवार, २३ जुलै, २०१८

राष्ट्रीय शैक्षणिक गुणवत्ता सर्वेक्षण अहवाल २०१८ - २२ जुलै २०१८

राष्ट्रीय शैक्षणिक गुणवत्ता सर्वेक्षण अहवाल २०१८ - २२ जुलै २०१८

* दरवर्षी दहावीच्या निकालाचा आणि विद्यार्थ्यांचा टक्केवारीचा आलेख उंचावत असला, तरी राष्ट्रीय गुणवत्ता सर्वेक्षणातून मात्र विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा घसरल्याची माहिती समोर आली आहे.

* नुकत्याच दहावी उत्तीर्ण झालेल्या राज्यातील ६६ टक्के विद्यार्थ्यांना गणितात ३५ टक्केही गुण मिळवता आलेले नाहीत. सामाजिक शास्त्रापासून ते विज्ञान विषयातही विद्यार्थ्यांची गुणवत्ता खालावल्याचे दिसते.

* या गुणवत्ता सर्वेक्षणात राज्यांचे जिल्हानिहाय निष्कर्स जाहीर केले आहेत. महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्हा पहिल्या पाच मध्ये आहे. मात्र शैक्षणिक गुणवत्ता चिंताजनक आहे. राज्याची राजधानी मुंबई शेवटच्या क्रमांकावर आहे.

[ अहवालातील राज्याचे चित्र ]

* गणितामध्ये राज्यातील सरासरी ६६% विद्यार्थ्यांना ३५ टक्क्यापेक्षा कमी गुण मिळालेत. तर केवळ १.३३ टक्के विद्यार्थी ७६ ते १०० टक्क्याच्या दरम्यान आहेत. याउलट राज्य मंडळाच्या परीक्षेत मात्र गणितात ८९.१३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

* विज्ञानात ६०.८७ टक्के विद्यार्थी ३५ टक्क्यापर्यंत आहेत. तर फक्त ०.७९ टक्का विद्यार्थी ७६ ते १०० टक्क्याच्या दरम्यान आहेत. राज्य मंडळाच्या परीक्षेत विज्ञान विषयाचा निकाल हा ९४.३७ टक्के लागला आहे.

* सामाजिक शात्रामध्ये ३९.९९ टक्के विद्यार्थ्यांची मजल ३५ टक्क्यापेक्षा कमी गुणांवरच थांबली आहे. केवळ ०.५४ टक्का विद्यार्थी ७६ ते १०० टक्क्याच्या दरम्यान आहेत. राज्य मंडळाच्या निकालानुसार मात्र ९६.१८ मुले उत्तीर्ण झाली आहेत.

* इंग्रजीत ५६.टक्के मुले ३५ टक्क्यापेक्षा कमी गुण मिळवणारी आहेत. मात्र राज्य मंडळाच्या निकालानुसार ९०.१२ टक्के विद्यार्थी ७६.१८ टक्के उत्तीर्ण झाली आहेत.

* इंग्रजीत ५६.६४ टक्के मुले ३५ टक्क्यापेक्षा कमी गुण मिळवणारी आहेत. मात्र राज्य मंडळाच्या निकालानुसार ९०.१२ टक्के विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. तर फक्त २.७० टक्के विद्यार्थी ७६ ते १०० टक्क्यांच्या दरम्यान आहेत.

* भाषा विषयातील विद्यार्थ्यांची कामगिरी बरी आहे. राज्यात १५.२८ टक्के विद्यार्थी ३५ टक्क्यापर्यंत आहेत. तर ७६ ते १०० टक्क्याच्या दरम्यान २०.९२ टक्के विद्यार्थी आहेत.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.