रविवार, २२ जुलै, २०१८

भारताचा धावपटू मोहम्मद अनासला सुवर्णपदक - २१ जुलै २०१८

भारताचा धावपटू मोहम्मद अनासला सुवर्णपदक - २१ जुलै २०१८

* भारताचा धावपटू मोहम्मद अनास याहियाने झेक रिपब्लिक येथील ४०० मीटर शर्यतीमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. ४५.२४ सेकंदात ही शर्यत पूर्ण करत मोहम्मदने नवीन राष्ट्रीय विक्रमही प्रस्थापित केला.

* काही महिन्यापूर्वी गोल्ड कोस्टमध्ये पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये मोहम्मदने ४५.११ अशी सर्वोत्तम वेळ नोंदविली होती. मात्र राष्ट्रकुल स्पर्धेत मोहम्मदला पदकाने हुलकावणी दिली होती.

* ऍथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाने [AFI] ट्विट करत मुहम्मद अनास आणि प्रशिक्षक गलीना बुखारींना यांचे अभिनंदन केले. याव्यतिरिक्त एम आर पूवम्मान देखील महिलांच्या ४०० मीटरची शर्यत ५३.०१ सेकंदात पार करत भारतासाठी सन्मान मिळवला.

* धावपटू राजीव अरोकिया यानेही २०० मीटरचे अंतर २०.७७ सेकंदात पार केले.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.