शनिवार, ७ जुलै, २०१८

जियोची गिगाफायबर ब्रॉडबँड सेवा सुरु होणार - ७ जुलै २०१८

जियोची गिगाफायबर ब्रॉडबँड सेवा सुरु होणार - ७ जुलै २०१८

* देशातील अकराशे शहरामध्ये अतिवेगवान जियो 'गिगाफायबर' ही स्थिरजोडणी ब्रॉडबँड सेवा देण्याची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी गुरुवारी केली. याच बरोबर 'जियो फोन २' ची घोषणा त्यांनी केली.

* अमेझॉनसारख्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी ईकॉमर्स कंपनी स्थापन करण्याचे सूतोवाचही मुकेश अंबानी यांनी यावेळी केले. याआधी रिलायन्सने मोफत व्हाईस कॉल आणि अतिशय कमी किमतीत इंटरनेट सेवा देऊन दूरसंचार क्षेत्रात उलथापालथ घडविली.

* तेल ते दूरसंचार क्षेत्रापर्यंत विस्तारलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा व्यवसाय २०२५ पर्यंत १२५ अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचा मानस आहे.

* कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांसमोर बोलताना मुकेश अंबानी म्हणाले स्थिर जोडणी गिगाफायबर ब्रॉडबँडसाठी ग्राहक १५ ऑगस्टपासून नोंदणी करू शकतील.

* गिगाफायबरची वैशिष्ट्ये - अतिवेगवान स्थिर जोडणी ब्रॉडबँड सेवा, लार्ज स्क्रीनवर अल्ट्रा एचडी मनोरंजन, मल्टी पार्टी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग, व्हाईस ऍक्टिव्हेटेड व्हर्चुअल असिस्टन्स, व्हर्च्युअल रिऍलिटी गेमिंग, डिजिटल शॉपिंग, स्मार्ट सोल्युशन.

* जियोफोनची वैशिष्ट्ये - यात आता व्हॉट्सऍप, फेसबुक, युट्युब, क्यूआरटी कीपॅड, डिस्प्ले २.४० इंच, रॅम ५१२ एमबी, रिअर कॅमेरा २ मेगापिक्सल, फ्रंट ०.३ मेगापिक्सल, बॅटरी २००० एमएएच, स्टोरेज २४०-३२० पिक्सेल, ओएस -केएआय ओएस. १५ ऑगस्टपासून २,९९९ रुपये. जुनाफोन देऊन नवीन फोन ५०० रुपयात मिळणार. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.