शुक्रवार, २० जुलै, २०१८

१०० रुपयाची नवी नोट लवकरच सादर - १९ जुलै २०१८

१०० रुपयाची नवी नोट लवकरच सादर - १९ जुलै २०१८

* शंभर रुपयाची नवी नोट लवकरच चलनात येईल. अशी माहिती रिझर्व्ह बँकेने गुरुवारी दिली. जांभळ्या रंगाच्या या नोटेवर गुजरातमधील पाटण येथील सरस्वती नदीच्या किनाऱ्यावरील [रानी की वाव] या बावडीचे चित्र असेल.

* नवी नोट चलनात आली, तरी जुनी नोट वैध असणार आहे. नव्या नोटेचा रंग जांभळा असेल आणि तिच्यावरील रचना या रंगाशी सुसंगत असेल.

* या नोटेचा आकार ६६ मिलीमीटर १४२ मिलीमीटर असेल. सध्या चलनात असलेल्या शंभर रुपयांच्या नोटेपेक्षा तिचा आकार छोटा असेल.

* सध्याच्या शंभरच्या नोटेचा आकार १५७ मिलीमीटर ७३ मिलीमीटर आहे. रिझर्व्ह बँकेने १०, ५० आणि ५०० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्यानंतर आता शंभरची नवी नोट चलनात येत आहे.

* नोटबंदीनंतर रिझर्व्ह बँकेने दोन हजार आणि दोनशे रुपयांच्या नोटा चलनात आणल्या होत्या. शंभर रुपयांच्या नव्या नोटेचे छायाचित्र रिझर्व्ह बँकेने गुरुवारी प्रसिद्ध केले.

* जांभळ्या रंगातील या नोटेवर गुजरातेतील प्रख्यात रानी की वाव ला स्थान देण्यात आले आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.