गुरुवार, १९ जुलै, २०१८

आशियाई कुमार कुस्ती स्पर्धेत विरेश कुंडूला ब्राँझ पदक - १७ जुलै २०१८

आशियाई कुमार कुस्ती स्पर्धेत विरेश कुंडूला ब्राँझ पदक - १७ जुलै २०१८

* आशियाई कुमार स्पर्धेत भारताला दुसऱ्या दिवशी ग्रीको रोमन प्रकारात विरेश कुंडूच्या एकमात्र ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. अन्य वजनी गटात भारताला अपयश आले. 

* ग्रीको रोमन प्रकारात इराणने २२५ गुणांसह विजेतेपद पटकावले. कझाकिस्तान १४७ गुणांसह दुसरे आले. भारताला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. 

* ९७ किलो वजनी गटात विरेशने ब्राँझच्या लढतीत जेऑनने पहिल्या ३० सेकंदात डावावर २ गुणांची कमाई केली. मात्र अखेरच्या टप्प्यात विरेशने थ्रो मारून चार गुणांची कमाई करत तांत्रिक गुणाधिक्यावर विजय मिळविला. 

* सचिन राणा ६० किलो, मलकीत हुडा ६७, कुलदीप मलिक ७२, आणि संजीत ८२ या मल्लांना आपापल्या वजनी गटात अपयश आले. कुलदीपला ब्राँझची संधी होती मात्र तो रिपेचेच फेरीत पराभूत झाला.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.