बुधवार, १८ जुलै, २०१८

जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट - १७ जुलै २०१८

जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट - १७ जुलै २०१८

* जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट असून पुढील वर्ष संपण्याआधी जगाला मंदीला सामोरे जावे लागेल. असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आयएमएफने व्यक्त केला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेला उभारी घेण्यासाठी मंदी आवश्यक आहे.

* त्यांच्या आर्थिक पाहणीत अंदाजात मंदीविषयी भाष्य करण्यात आले, यात म्हटले आहे की २०१८ आणि २०१९ मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत ३.९ टक्के विस्तार होईल. मागील वर्षी हा दर ३.७ टक्के होता.

* चालू वर्षी आणि पुढील वर्षी हा दर अधिक असेल. जागतिक अर्थव्यवस्था एका पातळीवर स्थिरावली आहे. यापुढे विस्तार होण्यास जागतिक अर्थव्यवस्थेवर अनेक आव्हाने आहेत.

* विकसित अर्थव्यवस्थांची वाढ चांगली राहण्याचा अंदाज असला तरी अनेक अर्थव्यवस्थांची वाढ चांगली राहण्याचा अंदाज आहे.

* अमेरिका, ब्रिटन, यांच्या अर्थव्यवस्थांच्या वाढीचा दर सध्या स्थिर असून जर्मनी, फ्रांस, इटली, कॅनडा यांच्या अर्थव्यवस्थेचा वेग मंदावत आहे.

* जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांची वाढ वेगाने होत आहे. व्यवसाय आणि ग्राहकांमधील आत्मविश्वास वाढत असल्याचे गुंतवणूकदारही आशावादी आहेत.

* याच वेळी या अर्थव्यवस्थामध्ये मंदी येण्याची चिन्हे आहेत. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग पुढील दोन वर्षात कमी होणार आहे. यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्यात आल्या, तरी त्यांचे परिणाम दिसून येण्यास खूप लवकर कालावधी लोटणार आहे.

* अर्थव्यवस्थेवरील आव्हाने - व्यापारी संबंधावरील तणाव, वाढते व्याजदर, राजकीय अस्थिरता, स्थिरावलेल्या वित्तीय बाजारपेठा.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.