मंगळवार, १७ जुलै, २०१८

मुकेश अंबानी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती - १६ जुलै २०१८

मुकेश अंबानी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती - १६ जुलै २०१८

* भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी आता आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांनी चीनचे जॅक मा यांना श्रीमंतीमध्ये मागे टाकले आहे. 

* जॅक मा हे अलीबाबा ग्रुपचे संस्थापक आहेत. मागच्या दोन दिवसात मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने दोन महत्वाचे टप्पे गाठले आहेत. 

* मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर बाजारातील भांडवली हिस्सा १०० अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचला तर दुसऱ्या बाजूला रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार मूल्य ७ लाख कोटीच्या पुढे गेले. 

* आता स्वतः मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे. शुक्रवारच्या व्यवहारात आयआरएलच्या शेअरने १,१०६.६५ ही सार्वकालीन उंची गाठली होती. 

* जॅक मा यांच्याजवळ ४४ अब्ज अमेरिकन डॉलर तर मुकेश अंबानी यांच्याकडे ४४.३ अब्ज अमेरिकन डॉलरची संपत्ती आहे. यावर्षी रिलायन्सच्या संपत्तीमध्ये ४ अब्ज डॉलरने वाढ झाली आहे. तर जॅक मा यांना १.४ अब्ज डॉलरचे नुकसान. 

* मुकेश अंबानी यांनी याआधी सुद्धा चिनी उद्योगपतीवर मात केली आहे. यापूर्वी त्यांनी डिसेंबर २०१७ मध्ये अंबानी यांनी हुई का यान या चिनी उद्योगपतीला श्रीमंतामध्ये मागे टाकले होते. 

* तेलापासून ते मोबाईलपर्यंत मुकेश अंबानी यांच्या कंपन्यांचे साम्राज्य विस्तारलेले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.