सोमवार, ९ जुलै, २०१८

शिक्षण क्षेत्रात मुंबई आयआयटी देशात प्रथम - ९ जुलै २०१८

शिक्षण क्षेत्रात मुंबई आयआयटी देशात प्रथम - ९ जुलै २०१८

* भारताला उच्चशिक्षणाला दर्जा प्राप्त करून देण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सुरु केलेल्या प्रतिष्टीत शिक्षण संस्थाच्या उपक्रमात पहिल्या २० संस्थांपैकी आज जाहीर झालेल्या पहिल्या संस्थांमध्ये आयआयटी मुंबईचा समावेश झाला आहे. 

* त्यानुसार मुंबई आयआयटीला पुढील ५ वर्षात केंद्राकडून १००० कोटींचा निधी मिळणार आहे. यातील खासगी संस्थांपैकी पहिल्या तीन प्रतिष्टीत संस्थांमध्ये रिलायन्स उद्योग समूहाच्या जियो इन्स्टिट्यूटचे नाव आहे. 

* केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज ट्विट करून पहिल्या सहा प्रतिष्टीत शिक्षण संस्थांच्या निवडीची इन्स्टिट्यूशन ऑफ एमीन्स घोषणा केली. यात २० शिक्षण संस्थांची निवड करण्यात येणार आहे. 

* आज झालेल्या निवड यादीत पहिल्या क्रमांकावर मुंबई आयआयटी, दुसऱ्या आयआयटी दिल्ली, आयआयएससी बंगळूर यांचा समावेश आहे. तर खासगी क्षेत्रात मणिपाल अकॅडमी कर्नाटक, बिट्स पिलानी राजस्थान, जियो इन्स्टिट्यूट यांचा समावेश करण्यात आला आहे. 

* जगातील दर्जेदार २००० विद्यापीठे व उच्चशिक्षण संस्थांमध्ये भारतातील एकाचाही समावेश नसल्याचे केंद्र सरकारने भारतातील शैक्षणिक संस्थांना जागतिक मानांकन मिळवून देण्याचा विडा उचलला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.