रविवार, १५ जुलै, २०१८

देशात पहिल्यांदाच इंटरनेट टेलिफोनीची सुरुवात - १२ जुलै २०१८

देशात पहिल्यांदाच इंटरनेट टेलिफोनीची सुरुवात - १२ जुलै २०१८

* सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने देशात पहिल्यांदाच इंटरनेट टेलिफोनी सेवेची सुरुवात केली आहे. या सेवेअंतर्गत बीएसएनएलचे ग्राहक मोबाईल ऍपद्वारे देशभरात कोणत्याही फोन क्रमांकावर कॉल करू शकतात.

* यासाठी बीएसएनएल ग्राहकांनी केवळ मोबाईल अँप wings डाउनलोड करण्याची गरज आहे. दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी ही सेवा आज लॉन्च केली.

* यापूर्वी जर समोरच्या व्यक्तीकडे तुम्ही वापरत असलेल ऍप असेल तरच ऍपद्वारे फोन कॉल करणं शक्य व्हायचं. पण बीएसएनएलच्या wings अँपद्वारे देशातील कोणत्याही फोन नंबरवर कॉल करता येणार आहे.

* याद्वारे कॉल करण्यासाठी सिमकार्डची गरज लागत नाही. या आठवड्यापासून या सेवेसाठी नोंदणी सुरु होत असून २५ जुलैपासून ही सेवा सुरु होईल.

* wings ऍपद्वारे बीएसएनएलचे ग्राहक देशातील कोणत्याही नेटवर्कच्या क्रमांकावर बीएसएनएल वायफाय किंवा अन्य कोणत्याही सर्व्हिस प्रोव्हाडायरवर कॉल करू शकतात.

* अँपद्वारे कॉलिंगला यापूर्वीच मान्यता मिळालेली आहे. मात्र बीएसएनएलची ही सेवा मोफत नसेल, सामान्य कॉलचे नियम लागू असतील. कारण ज्या टेलिकॉम कंपन्या इंटरनेट टेलिफोनी सेवा पुरवतात त्यांनी कॉल इंटरसेप्शन आणि मॉनिटरिंगची व्यवस्था करावी असे स्पष्ट निर्देश टेलिकॉम आयोगाने दिले आहेत.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.