मंगळवार, १० जुलै, २०१८

इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये आंध्रप्रदेश देशात प्रथम - १० जुलै २०१८

इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये आंध्रप्रदेश देशात प्रथम - १० जुलै २०१८

* इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये उद्योगस्नेही वातावरण आंध्र प्रदेश दुसऱ्यांदा प्रथम स्थानी आले आहे. आंध्र प्रदेश शेजारील तेलंगणा दुसऱ्या स्थानी आहे. तर अनुक्रमें हरियाणा, झारखंड, गुजरात, छत्तीसगढ, मध्यप्रदेश, कर्नाटक आणि राजस्थान यांचा क्रम लागतो.

* विशेष म्हणजे औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर असल्याचा दावा करणारा महाराष्ट्र १३ व्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राच्या आधी उत्तरप्रदेश नंतर ओडिशाचा क्रमांक लागतो.

* पहिल्या वर्षी क्रमवारीत केवळ सात राज्यांनीच सरकारने सुचवलेल्या ५०% सूचना लागू केल्या होत्या. दुसऱ्यांदा १८ राज्यांनी असे केले. तर यंदाच्यावेळी २१ राज्य या सूचित आले होते.

* गेल्या अर्थसंकल्पात सरकाराने राज्यांनी पूर्ण करायचे ३७२ कृती बिंदू निश्चित केले होते. २०१६ मध्ये आंध्रप्रदेश आणि तेलंगणा हे दोन्ही राज्ये अग्रस्थानी होते.

* सरकारचा उद्देश हा राज्यामध्ये गुंतवणूकदारांना आकर्षित करणे आणि व्यवसाय, व्यापारातील स्पर्धा वाढवण्याचा आहे.

* राज्यातील सरकारे हे इज ऑफ डुईंग बिजनेस अंतर्गत प्रक्रियेऐवजी एक खिडकी पद्धतीवर काम करत आहेत.सरकारने निर्धारित केलेल्या मानकांनुसार बांधकाम परवाना कामगार नियमावली, पर्यावरण नोंदणी, जागेची उपलब्द्ता आणि एक खिडकीचा समावेश आहे.

* जागतिक बँकेने काढलेल्या इज ऑफ डुईंग बिजनेसच्या यादीतही भारताची स्थिती सुधारली आहे. १९० देशामध्ये भारत १०० व्या स्थानी आहे. जागतिक बँकेच्या यादीत ५० क्रमांकांच्या आत येण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु होतात. 


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.