मंगळवार, १० जुलै, २०१८

खरीप ज्वारीचे देशातील पहिले जैवसमृद्ध वाण विकसित - १० जुलै २०१८

खरीप ज्वारीचे देशातील पहिले जैवसमृद्ध वाण विकसित - १० जुलै २०१८

* कुपोषण दूर करण्यासह बहुपयोगी असलेले खरीप ज्वारीचे जैवसमृद्ध वाण 'परभणी शक्ती' पीकेव्ही १००९ या नावाने विकसित करण्यात आले आहे. 

* लोह आणि जस्ताचे प्रमाण अधिक असलेले हे देशातील पहिलेच वाण असून, ५ जुलै रोजी हैद्राबाद येथे त्याचे प्रसारण करण्यात आले आहे.  

* वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी व आंतरराष्ट्रीय अर्ध कोरडवाहू उष्णकटिबंधीय पीक संशोधन संस्था इक्रिसॅट हैद्राबाद यांच्या संशोधनातून हे वाण विकसित करण्यात आले. 

* या संशोधित जैवसमृद्ध वाणांमध्ये लोह आणि जस्ताचे प्रमाण अधिक असल्याने मानवी जीवनावर व आरोग्यावर चांगला परिणाम होणार आहे. हे वाण महिला व लहान मुलांमधील कुपोषण दूर करण्यास उपयुक्त ठरेल. 

* रक्तातील लोहाच्या कमतरतेमुळे रक्तक्षय होण्याचे प्रमाण देशात अधिक आहे. त्यामुळे या आजारासाठी हे वाण उपयुक्त ठरणार आहे. 

* या संशोधित वाणांमध्ये लोह प्रतिकिलो ४४ ते ४६ मिलिग्रॅम आणि जस्त प्रतिकिलो ३२ ते ३३ मिलिग्रॅम असून भाकरीची प्रत चांगली आहे. 

* या वाणाचा कडबाही उच्चप्रतीचा असून उत्पादन क्षमता प्रति हेक्टरी ३६ ते ३८ क्विंटल व कडब्याचे उत्पादन १०५ ते ११० क्विंटल आहे. खोडमाशी, खोडकिड व काळ्या बुरशी या रोगास हा वाण प्रतिकारक्षम आहे. 

* विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर मोठ्या प्रमाणात बीजोत्पादन करून लवकरच हे वाण शेतकऱ्यांसाठी उपलब्द करून देणार आहे.  
 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.