रविवार, १ जुलै, २०१८

दत्ता पडसलगीकर राज्याचे पोलीस महासंचालक - १ जुलै २०१८

दत्ता पडसलगीकर राज्याचे पोलीस महासंचालक - १ जुलै २०१८

* मुंबईच्या पोलीसआयुक्तपदी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी सुबोध जैस्वाल यांची शनिवारी नियुक्ती करण्यात आली. केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेलं जैस्वाल यांच्या नावावर राज्याने अंतिम क्षणी शिक्कामोर्तब केले. व सायंकाळी त्यांनी पदभार सोडला.

* त्या आधी सकाळी पोलीस महासंचालक सतीश माथूर सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची सेवाज्येष्ठतेनुसार निवड करण्यात आली. माथूर यांना नायगाव पोलीस मैदानावर परंपरेनुसार निरोप देण्यात आला.

* पडसलगीकर यांच्या जागी महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाचे महासंचालक व राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त संजय बर्वे व ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची नावे आघाडीवर आहेत.

* दत्ता पडसलगीकर १९८२ चे आयपीएस अधिकार असून, ते अडीच वर्षे मुंबईच्या आयुक्तपदी होते. ते ३० ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत. पोलिसांची आठ तास ड्यूटी करण्याचे श्रेय त्यांना जाते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.