रविवार, १ जुलै, २०१८

दक्षिण मुंबईतील स्थापत्यकलेच्या वास्तूंना जागतिक वारसा म्हणून मान्यता - १ जुलै २०१८

दक्षिण मुंबईतील स्थापत्यकलेच्या वास्तूंना जागतिक वारसा म्हणून मान्यता - १ जुलै २०१८

* दक्षिण मुंबईतील १९ व्या व २० व्या शतकातील व्हीकटोरीयन गॉथिक शैलीच्या कलात्मक वस्तूंचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश  झाला आहे.

* युनेस्कोच्या जागतिक वारसा परिषदेच्या ४२ अधिवेशनात ही घोषणा करण्यात आली. युनेस्कोच्या वारसा स्थळ निवडीशी संबंधित समितीच्या अध्यक्ष शैखा हाया रशीद अल खलीपा यांनी यासंबंधी माहिती दिली.

* दक्षिण मुंबईतील मरिन ड्राइव्ह व फोर्ट परिसरात १९ व्या शतकातील व्हीकटोरीयन शैलीच्या व आर्ट डेको शैलीच्या व २० व्या शतकातील आर्ट डेको शैलीच्या इमारती आहेत.

* मुंबई उच्च न्यायालय, विद्यापीठ, जुने सचिवालय, राष्ट्रीय आधुनिक कलासंग्रहालय, एल्फिन्स्टन महाविद्यालय, डेव्हिड ससून ग्रंथालय, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, पश्चिम रेल्वे मुख्यालय, महाराष्ट्र पोलीस मुख्यालय डीजी ऑफिस.

* ओव्हल मैदान या व्हीकटोरीयन ह्या सर्व इमारती, तसेच क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, बॅकबे रेक्लमेशनची पहिली रांग, दिनशॉ वाच्छा रोडवरील राम महल, इरॉस व रिगल सिनेमा हॉल, मारिन ड्राइव्ह पहिल्या रांगेतील इमारतीचे जागतिक वारसा स्थळासाठी नामांकन झाले आहे.

* या घोषणेमुळे जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील एकूण सहा स्थळांचा समावेश झाला आहे. सर्वाधिक वारसा स्थळे असलेले महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे. यापूर्वी राज्यातील अजिंठा, वेरूळ, एलिफंटा लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारत आणि पश्चिम घाट या स्थळांचा समावेश आहे.

* देशातील एकूण ३७ स्थळे या यादीत आहेत. जागतिक क्रमवारीत भारत ७ व्या क्रमांकावर आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.