बुधवार, २० जून, २०१८

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून अमेरिकेची माघार - २० जून २०१८

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून अमेरिकेची माघार - २० जून २०१८

* मानवाधिकार परिषदेत सुधारणा होत नाही म्हणून अनेक दिवसापासून अमेरिकेकडून संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडण्याची धमकी दिली जात होती.

* अखेर त्यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पेमपियो आणि संयुक्त राष्ट्र परिषदेत दूत असलेले निकी हेली यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली.

* ४७ देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग असलेली ही परिषद इस्त्रायलविरोधी असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. गेल्या तीन वर्षांपासून अमेरिका संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेचा सदस्य होता.

* या परिषदेत अमेरिकेला नुकतंच दीड वर्ष पूर्ण झाल होत. अमेरिकेच्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या नाहीत असं वृत्त काही दिवसापासून आलं होत.

* तेव्हापासूनच अमेरिका संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेकडून बाहेर पडणार असल्याची चर्चा होती. याबाबत केवळ अधिकृत घोषणा झाली नव्हती.

* यापूर्वी अमेरिकेने माजी राष्ट्रपती जॉर्ज डब्लू बुश यांच्या कार्यकाळातही तीन वर्षासाठी मानवाधिकार परिषदेवर बहिष्कार टाकला होता.

* आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात पुन्हा अमेरिकेने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्या. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.